Socio-Architectural Blog

Thursday, June 24, 2010

झोप

मला आली झोप, जांभाई दिली जोरात,
आवाज झाला बराच,
वाकून पाहिलं हळूच, ऐकलं नाही ना कोणी.
वाटलं चेहेरयावर मारावे पाणी.
बोर असले तरी, बरेच होते काम,
गरमीने देखील फुटला होता घाम.
म्हणून पंखा लावला जोरात,
ऑफिस मधल्या (फाजील) गप्पा आल्या भरात.
रेडिओवर भैरवी लागली होती दुपारी !!!
तुडूंब जेवल्या वर चघळत होतो सुपारी..
कॉम्प्युटर समोर बसून शिणले होते डोळे,
उशी घेउन देखील पाठीत आले गोळे...
हळूच डोळे मिटले, ऑफिसशी नाते तुटले,
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
खडबडून जागा झालो, पाहतो तर घडाळ्यात दिसले सहा..
माझी उठण्याची वाट पाहत, टेबलावर थंड गार चहा...

0 Comments:

Post a Comment

<< Home