सरणार कधी रण
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शीरी
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शीरी
सरणार कधी रण ॥धृ॥
दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती -- २
कसा सावरू देह परी ॥१॥
होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले आधीर लोचन
खड्ग गळाले भूमीवरी ॥२॥
पावन खिंडीत पऊल रोवून
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण -- २
बोलवशीलका आता घरी ॥३॥
-कुसुमाग्रज
-शिवकल्याण राजा-
1 Comments:
खूप छान . हल्ली राजा शिवछत्रपती बघतेय त्या मुळे एकदम प्रभावी वाटलं.
Wednesday, March 4, 2009 at 4:40:00 PM GMT+5:30
Post a Comment
<< Home