सुरेख सकाळ
माफ करा पण याचा "सकाळ" पेपर वाल्यांशी काहिही संबंध नाही.
खरच, आज फारच सुरेख सकाळ पडली आहे. बरयाच दिवसांनी कोवळे ऊन पडले आहे. खूप दिवसांचा पाऊस मरगळ देऊन गेला होता, ती झटकून टाकावीशी वाटली. कधी नव्हे तो माझ्या सारख्या पक्क्या नास्तिकाला देखिल देवाला फुलं वहाविशी वाटली. तुपाचा दिवा लावून उदबत्ती ने घर सुगन्धी दरवळून टकावेसे वाटले. वाहिलेली फुले तरी कसली तर- प्राजक्ताची. काय सुंदर असते ते फूल! पहाटे पहाटे झाडावरून अलगद तरंगत ते खालती पसरलेल्या दुर्वांच्या गर्दीवर पडते. हिरव्या गवतावर पांढरे शुभ्र फूल काय छान दिसते! त्याचे ते केशरी देठ, तो सुन्दर आकार आणि मंद पण प्रसंन्न करणारा गंध. आजची सकाळ सार्थकी लाऊन गेला. आजच्या सकाळला अगदी "सणाचा" वास येतोय. उद्या पसून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाची आगामी चाहूल ती देते आहे. फुललेले प्रत्येक फूल हे पुढील आनंदाच्या खुणा दाखवत आहे. जोमाने उठून कामाला लागावेसे वटते आहे त्यामुळे मी आपली रजा मागतो...
" गणपती बाप्पा- मोरया! "
0 Comments:
Post a Comment
<< Home