Socio-Architectural Blog

Wednesday, November 12, 2014

का? का? फडणवीस

काकांकडून पाठींबा मिळवत महाराष्ट्रात दादांना संरक्षणाची हामी  देत सरकार बनवणारे एकविसाव्या शतकातील मुत्सद्दी फडणवीस, मला एकाच प्रश्न पडला आहे. का? का? 

 ह्यावेळची विधानसभा निवडणूक ही पूर्ण पणे ऐतिहासिक होती. शिवसेना वैचारिक दिवाळखोरी ने  ग्रासली आणी तेथूनच अफझल खानाच्या फौजेमधील मदमस्त हत्तींच्या सोंडा छाटण्याच्या वल्गना करू  लागली. आता मुद्दा काय होता? विषय काय होते? पण केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची काही उद्धवजींना स्वस्थ बसू देत न्हवती. 

कॉंग्रेस तर निवडणुकींच्या आधीच हरली होती आणी भ्रष्टवादी कॉंग्रेस, नोटा कुठे दडवू ह्या प्रयत्नात पूर्ण शहरी जनाधार गमावून बसली होती. 

महाराष्ट्रात भाजप कधीच आपली मुळे रुजवू शकला नव्हता. त्यांचे नेते ना कोणाला माहीत होते ना त्यांच्यामध्ये आणी राष्ट्रवादीच्या गुंठा-मंत्रीन्मध्ये काही फरक होता. दोन्ही पक्षाचे नेते साखर, शिक्षण आणी "Contruction " मधील "कार्यसम्राट" होते. 

त्यामध्येच एकमेव आशेचा किरण हा नरेंद्र मोदी हा होता. त्या माणसाची काम करण्याची पद्धत काहीही असो, पण त्यामध्ये काम करण्याची एक प्रामाणिक इच्छा आहे. त्या कामाचे परिणाम चूक का बरोबर हे येणारा काळच ठरवेल, पण सचोटी आणी चिकाटी ही तरूण पिढीला रुचणारी होती आणी आहे. 
नरेंद्र मोदी हे नाव पुढे करून शेवटी भाजप सत्तेच्या जवळ पोचली. भाजपने शिवसेनेनी केलेले अपमान दुर्लक्षून शिवसेनेचीच पंचाईत केली. आता शिवसेना ना पाठींबा देउ शकते, ना सरकार मध्ये सामील होउ शकते. कार्यकर्ते नावाची जी गुंडांची फौज हे सर्व पक्ष पाळतात त्यांना तोंडाशी आलेल्या सत्तेपासून (पैश्यांपासून) लांब ठेवणे महा काठिण असते. तरी शिवसेनेने हा एक शेवटचा उपाय करायचा ठरवला आहे. ह्यातून हा पक्ष जगतो वाचतो का ते बघायचे. 

आता प्रश्न आला की भाजप सरकार बनवेल कसं? (उत्तर तर काकांनी पहिल्या दिवशीच पाठींबा देउन सांगून टाकलं होतं. बिनशर्त पाठींबा.)

भाजप कडे महाराष्ट्रात कधीच पर्रीकर, गुजरात चे मोदी , शिवराज सिंह चौहान सारखे दिशादर्शक नेते नाहीत. त्यातल्या त्यात राहिले स्व. गोपीनाथ मुंडे आणी गडकरी. पण मुंडे घराणं आणी गडकरी हे आपसातच कुरघोडी करण्यात मश्गुल आहेत.  लोकसभा निवडणुकीत केवळ मोदींच्या नावावर निवडून आलेल्या सगळ्या शिवसैनिकांनी तर "एहसान फरमोश" होण्याचं ठरवलंच  आहे. भाजप मधील स्थिती देखील अशीच आहे. खुद्द गडकरी देखील मोदी करिष्म्याशिवाय निवडून आले नसते तर शिरोळ्यान्सारखा नेत्यांनी तर जिंकण्याचा विचार केला नसता. 
तीच परिस्थिती ही विधानसभा निवडणुकीची देखील होती. आता निवडून आलेले भाजपचे नेते हे मुख्यत्वे मोदी नावामुळेच आमदार होउ शकले आहेत. ही खरतर मोठी जवाबदारी आहे. स्वतःला शाबीत करून दाखवायची. कारण आता मतदार (निदान सुध्न्य) हा आता खूप शीघ्रकोपी आणि impatient  आहे. परत परत संधी आता मिळू शकणार नाही. त्यामुळे काम करण हा एकमेव मार्ग आहे. 
पण सध्या केवळ सरकार टिकवण्यासाठी जी धडपड चालू आहे त्यामुळे मी दिलेलं मत हे योग्य होतं का? हा संभ्रम सध्या उत्पन्न झाला आहे. 
भाजपच्या विजयामध्ये मोदी नावाबरोबरच शहरी मतदारांमध्ये काका, दादा, बाबा, राणे आणी आबां बद्दल भयंकर चीड आणी त्यांच्या पद्धतीच्या राजकारणाचा आलेला उबग ही मतदानाच्या वेळची विचार करायला लावणारी महत्वाची करणं होती. माझ्या सारख्या मतदाराला ह्या बिल्डर धार्जिण्या राजकारणामुळे झालेले शहरी प्रश्ण कायम भेडसावतात. पुण्यासारख्या शहराची ह्या मंडळींनी लावलेली वाट मला रोज बघावी लागते. तो मग BRT च्या मागे झालेला भ्रष्टाचार असो किवां जागो जागी बांधलेले पादचार्यांसाठी असलेले भुयारी व हवाई मार्ग असो. (ज्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरी कधी वापर केला असेल यावर शंका आहे). रस्त्यांची दुर्दशा करणारे. पुण्याचे पाणी साखर कारखान्यांना पळवणारे, असे हे सगळे माननीय कधी ना कधी (ह्या पाच वर्षात) त्यांच्या हावरटपणाची शिक्षा भोगतील असा समाज करून मी मतदान केलं आणी अपेक्षे प्रमाणे परिणाम पण आले. 
पण जर आता राष्ट्रवादी चा पाठींबा घेउन जर भाजप सरकार बनली तर ह्या सगळ्या धोटाळेबाजान्ना संरक्षण मिळू शकेल. हा मी माझा आणी लोकशाहीचा अपमान समजतो
नाना फडणवीस हे मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होते पेशवाईतील खूप मोठ्या आणी महत्वाच्या कालखंडात त्यांनी परत परीस्थिती सुधार केला होता. पण त्यांच्या आडनाव वंशजांनी नारायण रावांना  मारणार्या राघोबा 'काकांशी' जवळीक साधावी हे दुर्दैव आहे. केवळ सत्ते साठी केलेला हा तह अक्खी पेशवाई बुडवू शकते याची आठवण ठेवावी. मेलेल्या नारायण पेशव्यावर परत वार करणारा पवार नावाचा राघोबांचा सेवक हा बारामातीचाच होता (ref : ठाकरी, बाळासाहेबांचे गाजलेले अग्र लेख). 
वाजपेयी सरकार पासून ते मोदी सरकार मधील रा. स्व. सं ची असलेली भूमिका कमी कमी अथवा केवळ सत्ते साठी काहिही अशी झालेली दिसते. हे भाजपच्या भविष्या साठी धोकादायक आहे. बाकी पक्षामधून आयात केलेले पाचपुतेन्सारखे नेते हे शेवटी कुठलाही वैचारिक base नसलेले असतात. त्यामुळे पूर्ण पक्ष हा कमकुवत होतो. हे असले निर्णय माझ्यासारखे शहरी मतदाराला संभ्रमित करतात. 

बघूया आज रात्री पर्यंत काय होते ते. 

पण काही केल्या " काका मला वाचवा " अशी आरोळी ठोकण्याची पाळी ह्या नवीन सरकार वर येउ नये आणी रामशास्त्रींनी दाखवलेली सचोटी आणि न्याय निपुणता जी राधोबा दादा (काका ) ह्यांना देहदंडाची शिक्षा देउ शकते, ही  ह्या नवीन फडणविसांनी दाखवावी हीच माझी श्री (?) चरणी प्रर्थना. 


शिरीष 

ता क 

14/11/14

शेवटी भाजप ने खड्यात पडायाचे ठरवलेले दिसते. असंगशी संग ही महाराष्ट्राची जुनी परम्परा आहे. आणि त्या