Socio-Architectural Blog

Saturday, March 01, 2008

माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे ॥धृ॥

व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे ॥१॥

कधी ऐकतो गीत झऱयातुन,
वंशवनाच्या कधी मनातुन
कधी वाऱ्यातुन कधी ताऱ्यातुन, झुळ्झुळतात तराणे ॥२॥

तो लीलाघन स्तय चिरंतन,
फुलापरी उमले गीतांतुन
स्वरास्वरांतुन आनंदाचे, नित्य नवे नजराणे ॥३॥

या विहगांनो माझ्या संगे,
स्वरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन, उसळे प्रेम दिवाणे ॥४॥
-मंगेश पाडगांवकर