Socio-Architectural Blog

Tuesday, August 22, 2006

झळ.......

मी केलेले पाप अंगाशी आले, मिळालेले शाप शाश्वत झाले.
विसंबून राहिलो नशिबावर, विश्वास ठेवला भविष्यावर..
भविष्य माझे हरविले, माझ्या हातून भगवंता हे काय करविले!!

देवावर नव्हता कधिच विश्वास, तरी सतत व्हायचा (त्याचा) आभास..
फारकत घेतली त्याच्याशी, तरी खायचो फक्त तुपशी,
लोळत बसून उशाशी, ती मात्र रहायची उपाशी.
उशी होती मऊ मऊ, आजी द्यायची रोज गोड खाऊ.
गोड खाऊन, खाल्या मिठाला विसरलो!
निर्लज्जतेच्या कुठल्या गर्तेत घसरलो!
ही घसरण कही थांबेना, तळ कही दिसेना.

या घसरण्याचा आलाय मला वीट, नरक-तळ तरी दखव मला नीट!
निदान पायांना आधार मिळेल, अस्तित्वाचे कारण तरी कळेल.

अस्तित्वासाठी लढतो आहे, दाटली जळमटे कढतो आहे.
ही लढाई जीवन-मरणाची, ही वेळ कार्य करण्याची.

उठ!! उभा रहा!!!!
नव्या दिशेला दिव्य आसमन्त पहा!
त्या दिशेला धाव आहे घ्यायची, समाजाची लाज कोळून प्यायची.
या भेकड जगावर पाय रोवून उभा रहा, करारी नजरेने दुर्जनांना पहा.
बघ होईलच तुझ्या हातून कार्य महान, तरी तू रहा मनाने लहान.

लहानपण निष्पाप असते, रडणं सोडून खुदकन हसते.
असे मन हवे मला, सहव्या लागल्या जरी असंख्य झळा,
पुसून टाकीन मी गतायुष्याचा फळा,
तरी काय वाटून/ आठवून, दाटून येतो माझा गळा??

----------शिरीष माधव गानू.
२१/ ०८/२००६

0 Comments:

Post a Comment

<< Home